गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे
धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे ||१||
गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला
कड्याशी आदळे धारा वात आवर्त होत असे ||२||
तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ||३||
दराच तुटला मोठा झाड खंडे परोपरी
निबिड दाटती छाया त्यामधी वोघ वाहती ||४||
गर्जती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयकरे
गडत होतसे रात्री ध्वनी कल्होळ उठती ||५||
कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ||६||
विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे
कथा निरुपणे चर्चा सार्थके काळ जातसे ||७||
धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे ||१||
गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला
कड्याशी आदळे धारा वात आवर्त होत असे ||२||
तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ||३||
दराच तुटला मोठा झाड खंडे परोपरी
निबिड दाटती छाया त्यामधी वोघ वाहती ||४||
गर्जती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयकरे
गडत होतसे रात्री ध्वनी कल्होळ उठती ||५||
कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ||६||
विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे
कथा निरुपणे चर्चा सार्थके काळ जातसे ||७||
1 comment:
शिवथरघळीमध्ये समर्थाची ही कविता लावली आहे . शिवथरघळीचे याहून सुंदर वर्णन कोणीही केले नसेल. त्यातील "धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे" हि ओळ जास्त लक्ष वेधून घेते . धबाबा , लोटणे , आदळणे ह्या शब्दांचा एकत्र वापर केल्याने त्या धबधब्याची तीव्रता जाणवते . मी शाळेत असताना हि कविता शिवथरघळीत प्रथम वाचली . पण प्रत्येक वेळी कुठलाही धबधबा पाहताना अजूनही ही ओळ आठवते
Post a Comment