Sunday, September 9, 2012

धबाबा तोय आदळे -- शिवथरघळीचे वर्णन समर्थांच्या वाणीत

गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे 
धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे ||१|| 

गर्जता मेघ तो सिंधू ध्वनी कल्होळ उठिला
कड्याशी आदळे धारा वात आवर्त होत असे ||२|| 

तुषार उठती रेणू दुसरे रज मातले वात 
मिश्रित ते रेणू सीत मिश्रित धुकटे ||३|| 

दराच तुटला मोठा झाड खंडे परोपरी  
निबिड दाटती छाया त्यामधी वोघ वाहती ||४|| 

गर्जती श्वापदे पक्षी नाना स्वरे भयकरे  
गडत होतसे रात्री ध्वनी कल्होळ उठती ||५|| 

कर्दमु निवडे नातो मानसी साकडे पडे  
विशाळ लोटती धारा ती खाले रम्य विवरे ||६||  

विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे 
कथा निरुपणे चर्चा सार्थके काळ जातसे ||७||